vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धारावीत संविधान वाचन व शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली

[ मुंबई प्रतिनिधी] धारावी येथे

भारतीय संविधानाला यावर्षी २०२५ ला ७५ वर्ष पूर्ण झाले. त्याचे औचित्य साधून *२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस* राष्ट्रीय चर्मकार संघाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना एकत्र करून धारावी येथील संत रोहिदास मार्गावरील संविधान चौक येथील स्तंभ व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान अर्पण प्रतिमेला पुष्पहार घालून समाजाप्रती आदरांजली व संविधानाचे महत्त्व याविषयी चर्मकार नेते बाबुराव माने यांनी उपस्थित जनसमुदायाला सविधान महत्व पटवून दिले त्यानंतर श्री. अनिल कासारे यांनी संविधानाची उद्देशिकेचे वाचन केले अत्यंत कमी वेळात समाज बांधवांना एकत्र आणून संविधान दिनाच्या औचित्य व २६ नोव्हेंबर मध्ये लढता लढता वीर झालेल्या शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी मांडली व प्रत्यक्षात अमलात आणली गेली हे विशेष मुंबई अध्यक्ष श्री. विलास गोरेगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्री. गिरीराज शेरखाने यांनी स्वतःहून उद्देशिकेचे प्रती व शहिदाचे छायाचित्र प्रति मोफत वाटप केल्या या कामी श्री. शंकर बळी, सुनील पवार,विजय खरात, किरणताई पोटे, दिलीप दडस, बाबा कदम, पंडित कदम यांनी पुढाकार घेतला होता कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर मध्ये वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

संबंधित पोस्ट

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- २०२५’ चे उद्घाटन व नवीन इलेक्ट्रिक बस लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत शनिवारी भक्ति योग कार्यक्रम- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

vishwatmaklokswamivarta

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ।

रायगड जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्ण व दमट हवामानाची शक्यता🌡️

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

vishwatmaklokswamivarta