vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

 

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाच्या धडक कारवाया सुरु आहेत. मलकापूर तालुक्यातील मौजा नरवेल परिसरातील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ८ टिप्पर व १६ ब्रॉस वाळू जप्त करण्यात आली असून, एकूण अंदाजे १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास केली आहे.

दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास, पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर हद्दीतील नरवेल कोटेश्वर मंदिर शिवार येथे पेट्रोलिंग सुरू असताना जमुनापुरी घाटातून मलकापूरकडे शासनाचा महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांसह पंचांना सोबत घेऊन नाकाबंदी केली.

नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरीत्या येणारी ८ टिप्पर वाहने थांबवून तपासणी केली असता, चालकांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे आढळून आले. पंचासमक्ष तपासणीमध्ये प्रत्येकी सुमारे २ ब्रॉस वाळू असे एकूण १६ ब्रॉस वाळू (अंदाजे किंमत २ लाख रुपये) तसेच प्रत्येकी अंदाजे २० लाख रुपये किमतीची ८ टिप्पर वाहने जप्त करण्यात आली. अशा प्रकारे वाळू व वाहनांसह १ कोटी ६२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी पो.स्टे. एमआयडीसी दसरखेड भाग-०५, गुन्हा अप. क्र. १७५/२०२५ अन्वये कलम ३०३(२) भान्यासं सह कलम २१(१), २१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मलकापूर येथील ६ जण, नांदुरा आणि मोताळा येथील एका जणाचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या टिप्पर वाहनांचे क्रमांक MH-28-BB-6174/ 2895/ 4414/ 4172/ 1210/ 8910/ 7935 / 7397 असे आहेत.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

संबंधित पोस्ट

खोटे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती घेतलेल्या अधिकारी विरुद्ध गुन्हे दाखल करून बडतर्फ करा-भारतीय मानवाधिकार संघटन ची मागणी

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास एक तृतीयांश महिला आहेत; नवीन भारत महानगरांच्या पलीकडे व्यापक सहभागाचा साक्षीदार होत आहे : डॉ जितेंद्र सिंह

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांनाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वस्त्रहरणकार ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta