vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल

वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन..

नवी दिल्ली, प्रतिनिधी:भारत मंडपम, नवी दिल्ली येथे 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे प्रदर्शन भारताच्या कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात जगभरातील उत्पादक, खरेदीदार, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला असून, महाराष्ट्राने या संधीचा प्रभावीपणे लाभ उठवला आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करत राज्यातील कृषी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.

मंत्री जयकुमार रावल यांनी उद्घाटनानंतर सांगितले की, वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभाग घेण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देणे, नव्या गुंतवणुकीला आकर्षित करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हा आहे. महाराष्ट्र हे द्राक्षे, संत्री, आंबा, केळी, डाळिंब, पेरू यांसारख्या फळांचे आणि हळद, मिरची, लसूण यांसारख्या मसाल्यांचे प्रमुख उत्पादक राज्य आहे. या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यासाठी पॅकिंग, प्रक्रिया, लॉजिस्टिक आणि ब्रँडिंग यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रदर्शनाचे व्यासपीठ या सुधारणांसाठी एक उत्तम संधी ठरेल, असेही मंत्री श्री. रावल यांनी अधोरेखित केले.

प्रदर्शनादरम्यान मंत्री श्री. रावल यांनी जर्मनी, रशिया, जपान आणि इस्रायल यांसारख्या देशांच्या दालनांना भेटी देऊन त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेतला. इस्रायलचे जलसिंचन तंत्रज्ञान, जपानचे पॅकिंग आणि साठवणूक तंत्रज्ञान तसेच रशियाच्या प्रक्रिया उद्योगातील नवोन्मेष यांचा महाराष्ट्रातील शेतकरी आणि उद्योगांना लाभ होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परदेशी कंपन्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून, लवकरच गुंतवणुकीसंबंधी काही महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात आधुनिक प्रक्रिया प्रकल्प, कोल्ड स्टोरेजेस, निर्यात केंद्रे आणि लॉजिस्टिक सुविधा उभारण्यास गती मिळेल.

संबंधित पोस्ट

इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी १५ दिवसांत कृती आराखडा सादर करा – मंत्री दादाजी भुसे इगतपुरी नगरपरिषद आढावा बैठक

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार…

vishwatmaklokswamivarta

मोताळा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिलला सोडत..

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती! हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – श्री. नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय

vishwatmaklokswamivarta