vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी रोजी अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यादिवशी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जातात. या दिवशी धार्मिक विधी करताना बाहविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता अक्षय तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदूश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर तालुका स्तरीय अधिकारी दुरदूश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी दुरदूश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह होता कामा नये. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार, मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे कमी असणे अनिवार्य आहे.

 त्या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याकरिता ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि मुख्याध्यापकांनी यावर लक्ष ठवावे. बालविवाह होत असल्यास जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग तसेच चॉईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर तात्काळ कळवावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा संर

              रायगड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि यंत्रणांनी प्रशासनाला सहकार्य करावे, गावात किंवा परिसरात असा कोणताही प्रकार घडत असल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे भवितव्य सुरक्षित राहील आणि कोणतीही अघटित घटना घडणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एक जागेसाठी पोटनिवडणूक घोषित…

कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न-खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी — रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

नवीन किटमुळे आधार सेवा अधिक सुलभ, दर्जेदार होण्यास मदत – जिल्हाधिकारी अशोक काकडे- २० आधार सेवा केंद्र चालकांना नवीन अद्ययावत किटचे वाटप – ⁠एका संचात १५ वस्तुंचा समावेश

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा विभागातील दलित आदीवासी भूमिहिन कास्तपट्टे नावेकरुन सातबारा उतार्‍याला नोंद घ्या – महसुलमंत्र्याकडे शिवसेना दलितआघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांची निवेदनाव्दारे मागणी..

गडचिरोलीचे स्वतंत्र व्हिजन ठरवा; राष्ट्रीय सरासरीपेक्षा पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवा”*सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून प्रधानमंत्री धनधान्य किसान योजनेचा आढावा*

vishwatmaklokswamivarta