
नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात सुरक्षित वाढ…
राज्य प्रतिनिधी-
नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद मार्च काढण्यात आला.
मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक या मार्चमध्ये सहभागी झाले.
दरम्यान यामध्ये आंदोलनामध्ये अनेक उपद्रवी सामील झाल्याची माहिती आहे आहे जे संसदेत घुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चर्चा समोर येत आहे ज्याप्रकारे काही देशांमध्ये ज्या प्रकारे आंदोलन करण्यात आले त्याच धर्तीवर संसद भवन वर कब्जा करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे आंदोलन करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे
आज पर्यंत भारतात अशा कोणताही प्रयत्न उपोषणकर्त्यांनी केला नव्हता परंतु हा विघातक प्रयत्न विद्यार्थ्यांच्या नावाखाली करण्यात येत असल्याची चर्चा सध्या देशात जोर धरत आहे
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, परिसरातील काही मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी जंतरमंतरवरील उपोषण मागे घेतले असले, तरी पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत देशव्यापी आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.



