vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन..

नाशिक, प्रतिनिधी : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध घाट, रस्ते तसेच अनुषंगिक पायाभूत सुविधा विकसित करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि मार्च 2027 या विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन, तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक रविवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॅा. डी. एस. स्वामी, जलसंपदाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेले विविध घाटांची कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. या कामांची अद्ययावत प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी, आवश्यक विभागीय समन्वय तसेच प्रलंबित बाबींचा आढावा मंत्री श्री. महाजन यांनी घेतला. ही कामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.

कामांच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विविध विभागांनी एकत्रित आणि समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. जलसंपदा, महसूल, भूमी अभिलेख, पोलिस, वन विभागाने त्यांच्याशी संबंधित बाबी एकत्रितपणे मार्गी लावून कामांना वेग द्यावा, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

यावेळी गोदावरी नदीवरील उजव्या तिरावर गोदावरी कपिला नदीच्या संगमाच्या वरील बाजुस घाट बांधणे, गोदावरी नदीवरील डाव्या तिरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या खालील बाजुस घाट बांधणे, गोदावरी नदीच्या डाव्या तिरावर ओढा येथे गणपती मंदिरा लगत उर्ध्व व निम्न बाजुच्या लांबीत नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नानाकरिता “ओढा राम घाट” व परिसर विकसीत करणे, दसक पूलाच्या उर्ध्व बाजूकडील दसक शिवारात उजव्या बाजूस घाट बांधणे व परिसर विकसीत करणे, दसक पूलाच्या उर्ध्व बाजूकडील नांदूर शिवारात डाव्या बाजूस घाट बांधणे व परिसर विकसीत करणे, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकिनारी (उजवा व डावा तीर) नवीन घाट बांधकाम व अनुषंगीक कामे, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरातील विकेंद्रीत पाणीसाठे पुर्णपणे भरण्यासाठी तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील गोदावरी नदी कायमस्वरुपी प्रवाहित राहण्यासाठी गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजनेची कामे आणि गोदावरी नदीवरील डाव्या तिरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे तसेच गोदावरी नदीवरील उजव्या तिरावर टाकळी येथे गोदावरी नंदिनी नदीच्या संगमाच्या वरील बाजूस घाट बांधणे आणि गोदावरी नदीवरील नंदिनी संगम येथे रबर बंधारा (बलुन बंधारा) बांधणे या कामांच्या प्रगतीचा आढावा मंत्री श्री. महाजन यांनी घेतला. अधिक्षक अभियंता श्री. मिसाळ यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच विभागीय आयुक्त श्री. गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती बैठकीत दिली.

 

यावेळी संबंधित प्रकल्पांशी निगडित सर्व भूसंपादन अधिकारी व संबंधित महसूल अधिकारी, संबंधित कार्यकारी अभियंते, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

vishwatmaklokswamivarta

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

vishwatmaklokswamivarta