vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य..

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची प्रभावी तयारी करता यावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. तसेच, अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘बार्टी’, पुणे कार्यालयाकडे पोस्ट अथवा कुरियरद्वारे पाठविणे बंधनकारक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक असून, २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी उमेदवाराची वयोमर्यादा कमाल ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्जासोबत जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, ओळख पुरावा तसेच उमेदवाराच्या स्वतःच्या नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची प्रत जोडणे आवश्यक आहे. केवळ ऑनलाईन अथवा केवळ ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८/२८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – ४११००१ या पत्त्यावर पाठवावी. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२६३३३३३० अथवा ०२०-२६३३३३३९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत – पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणीमतदार पडताळणीसाठी 11 ते 14 एप्रिलपर्यंत विशेष कॅम्प

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta