vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणीमतदार पडताळणीसाठी 11 ते 14 एप्रिलपर्यंत विशेष कॅम्प

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणीमतदार पडताळणीसाठी 11 ते 14 एप्रिलपर्यंत विशेष कॅम्प

        सांगली, प्रतिनिधी :आगामी येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सन 2002 च्या मतदार यादीतील मतदारांचे दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मतदार यादीशी पडताळणी करण्याचे कामकाज सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्तरावर सुरू करण्यात आले आहे. या कामकाजाच्या दृष्टीने 282-सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये 11 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याचे 282-सांगली विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी समाधान शेंडगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

     प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सेल्फ मॅपिंग व रक्तनातेसंबंधातील मतदार शोधणे द्वारे सन 2002 ची विशेष सखोल पुनरिक्षणची अंतिम मतदार यादी व सन 2024 ची विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी या दोन्ही यादींची तुलना करून ज्यांची नावे 2002 विशेष सखोल पुनरिक्षणच्या अंतिम मतदार यादीत उपलब्ध नाहीत, अशा मतदारांचे मॅपिंग त्यांचे आई वडील व आजी आजोबा यांची नावे शोधून प्रॉग्नी मॅपिंग (Progeny Mapping) करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने 282- सांगली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

     282-सांगली सांगली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बीएलओ यांनी मागितलेली माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यपध्दतीमध्ये मतदारांचे सेल्फ मॅपिंग व प्रॉग्नी मॅपिंग पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदारांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या वास्तव्याची माहिती घेऊन निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर भेट देऊन मतदारांची सन 2002 विशेष सखोल पुनरिक्षणची माहिती उपलब्ध करून मॅपिंग करण्याचे आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांशी समन्वय साधला असून सर्व राजकीय पक्षांनी सुध्दा याबाबत मतदार केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांची नियुक्ती करून या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *केवळ हस्तांदोलन टाळणे पुरेसे नाही; भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करा !* – हिंदु जनजागृती समितीची पुणे व अहिल्यानगर येथील आंदोलनाद्वारे मागणी** आतंकवाद आणि क्रिकेट एकत्र होऊ शकत नाही !*

vishwatmaklokswamivarta

नोएडातील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जालना जिल्ह्याची सुवर्ण झेप,जालन्यात विजेत्या कराटेपटूंचे जल्लोषात स्वागत; महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते सत्कार, अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती, शहरातून विजयी रॅली

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न                                          

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. 

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत – पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta