
राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात राज्यातील विविध प्रकल्पग्रस्त संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या रोजगार, समांतर आरक्षण, पर्यायी जमीन वाटप, पुनर्वसन तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी मदत व पुनर्वसन विभाग,जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिमंडळासमोर धोरणात्मक निर्णयासाठी प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.



