vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

*सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन

*सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन*

*छ. संभाजीनगर / प्रतिनिधी* – सत्यशोधक समाज प्रतिष्ठानतर्फे सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त “सत्यशोधक समाज आणि आजचे वास्तव” या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन बुधवार, दि. २4 सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५ वा. मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल, टीव्ही सेंटर रोड, सलीम अली सरोजवळ, हडको, छ. संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. डॉ. आर. शेळके (सत्यशोधक समाज कार्यकर्ते) हे असणार आहेत. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. सुधाकर शेलार (सत्यशोधक अभ्यासक, अ.नगर) आणि प्रा. नूतन माळवी (सत्यशोधक महिला अभ्यासक, वर्धा) यांचे मार्गदर्शन होणार आहे.

या प्रसंगी साथी सुभाष लोमटे, प्रा. राम बाहेती, अॅड. शिवाजी शिंदे, डॉ. भीमराव बनसोड, अॅड. भगवान भोजने, प्रा. डॉ. संजय मून, सुभेदार सुखदेव बन, नौशाद उस्मान, सुभाष महेर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. के. ई. हरिदास (अध्यक्ष, सत्यशोधक समाज प्रतिष्ठान), इंजि. चेतन राऊत, प्रा. भारत सिरसाट, ॲड. वैशाली डोळस, डॉ. समाधान इंगळे, अनंत भवरे, इजि. महेश निनाळे, सविता अभ्यंकर, ग.ह. राठोड, डॉ. नवनाथ गोरे, रतनकुमार साळवे, डॉ. अरूण कांबळे, कॉ. मधुकर खिल्लारे, डॉ. सविता लोंढे, आशा डांगे, कॉ. वसुधा कल्याणकर, रामदास अभ्यंकर, डॉ. धोंडोपत मानवतकर, सुधाकर निसर्ग, अमरदीप वानखडे, भाऊ पठाडे, रमेशचंद्र धनेगावकर, डॉ. अविनाश अंकुशराव, प्रभाकर आरसूड, धम्मरक्षित सामुद्रे, अॅड. उमेश इंगळे, राहूल इंगळे, शिवनाथ पवार, प्रा. सुनिल वायसळ, प्रा. सुनिल बनकर, प्रा. गोपालकृष्ण खोमणे, विष्णू वखरे, निशांत पवार, वसंत जोगदंड प्रा. मारूती दवणे आदींनी केले आहे

संबंधित पोस्ट

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- बंदी नातेवाईक भेटीसाठी मुलाखत कक्षाचे उद्घाटन – कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

नवी मुंबई महानगरपालिका आयोजित आंतरशालेय सांस्कृतिक चषक 2024 – 25 अंतिम फेरीचा शुभारंभ*

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार -कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…