vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका आयोजित आंतरशालेय सांस्कृतिक चषक 2024 – 25 अंतिम फेरीचा शुभारंभ*

*नवी मुंबई महानगरपालिका आयोजित आंतरशालेय सांस्कृतिक चषक 2024 – 25 अंतिम फेरीचा शुभारंभ*

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये नवी मुंबई शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक चषक अंतर्गत नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, लघुनाटिका स्पर्धा व पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  दिनांक 12 मार्च 2025 रोजी पथनाट्य आणि लघुनाट्य या स्पर्धांच्या अंतिम फेरीस विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे सुरुवात झाली. पथनाट्य आणि लघुनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या प्रत्येकी १० शाळांनी आपली कला सादर केली. पथनाट्य स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिध्द अभिनेते श्री अरुण कदम व श्री अनिल सुतार यांनी केले. लघुनाटिका स्पर्धेचे परीक्षण अभिनेते श्री विकास पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे पाटील, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर व इतर मान्यवर उपस्थित होते.
  दिनांक 13 मार्च 2025 रोजी गायन व नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून गायन स्पर्धेचे परीक्षण नामांकित संगीतकार श्री. राहुल रानडे आणि नृत्य स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिध्द कलावंत श्री. नकुल घाणेकर करणार आहेत.  गायन व नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी झाल्यानंतर आंतरशालेय सांस्कृतिक चषक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायं ५ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न होणार आहे
000000

संबंधित पोस्ट

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ कल्याण आरटीओ कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक२५१ वाहनचालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी-मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा

vishwatmaklokswamivarta

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप