धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ कल्याण आरटीओ कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक२५१ वाहनचालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी मंजूर
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ कल्याण आरटीओ कार्यालयाचा राज्यात दुसरा क्रमांक२५१ वाहनचालकांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी मंजूर
ठाणे, प्रतिनिधी : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सन्मान निधी योजनेंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या आणि दिनांक 01 जून 2026 पर्यंत सभासद नोंदणी केलेल्या पात्र सभासदांना प्रत्येकी 10,000/- रुपये (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) सन्मान निधीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. या सन्मान निधीचे धनादेश वितरण दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 9:00 वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते.
कल्याण आरटीओ कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याणच्या कार्यक्षेत्रात एकूण 5,800 वाहनधारकांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सभासदत्व स्वीकारले आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर कल्याण कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय (2) क्रमांक पटकावून बहुमान प्राप्त केला आहे. या विशेष यशाबद्दल माननीय उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. आशुतोष बारकुल यांचा सत्कार करण्यात आला.
लाभार्थींची संख्या कल्याण कार्यक्षेत्रातील एकूण 5,800 सभासदांपैकी वयाची 65 वर्षे पूर्ण झालेले 251 वाहनधारक या सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरले असून, त्यांना प्रत्येकी 10,000/- रुपयांचा लाभ मंजूर झाला आहे.