vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत जाहीर आवाहन*

*नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत जाहीर आवाहन*

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाणी देयकाबाबत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश मोबाईल व्हॉटस-अप क्रमांकावरून प्रसारित होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक असल्याचे सांगत नागरिकांना ०९८३४२२५७६८ या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे. या क्रमांकावर संपर्क करा अन्यथा तुमचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल असा संदेश दिला जात आहे. परंतू हा संदेश नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रसारित करण्यात आलेला नसून दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक हा नवी मुंबई महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचा नाही. त्यामुळे या क्रमांकावर कोणीही संपर्क करु नये.

याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, त्यांनी पाणी देयके ही नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय तसेच अधिकृत पाणी देयक भरणा केंद्र या ठिकाणीच भरणा करावीत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन व पाणी देयकावरील QR कोडव्दारे पाणी देयके भरणा करावीत. तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

0000000

संबंधित पोस्ट

सर्व विभागांनी समन्वयाने महिलांच्या समस्या सोडवाव्यात- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य —-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवास प्रारंभ होत असून आरती संग्रहातून नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता व पर्यावरणशीलतेचा संदेश…

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन,शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- ॲड. निलेश हेलोंडे पाटील

vishwatmaklokswamivarta

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणेमार्फत“मास्टर ट्रेनर्स” प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू