vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सुविधांवर वारकरी समाधानी

मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सुविधांवर वारकरी समाधानी ….

पंढरपूर, प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राज विभागाने पुरवलेल्या सोयी-सुविधांमुळे वारकरी समाधानी झाले आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन सुविधांची पाहणी केली व संस्थानचे विश्वस्त, सोहळा प्रमुख आणि वारकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

जमिनीवर बसून घेतला प्रसाद:

मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न ठेवता पालकमंत्री गोरे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर वारकऱ्यांसमवेत पायी चालत कारुंडे बंगला येथील माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन सोहळा प्रमुखांची भेट घेतली. सोहळा प्रमुखांसमवेत जमिनीवर मांडी घालून वारकऱ्यांसोबत प्रसाद घेतला व कार्यालयातही जमिनीवर बसून सोहळ्यातील सुविधांबाबत चर्चा केली.

 

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी संस्थानच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे महावस्त्र व प्रसाद देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मराठी चित्रपट अभिनेते भाऊ कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांचेही सोहळा प्रमुखांच्या वतीने स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी पांढरे व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

वारकऱ्यांना रेनकोट वाटप:

ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. सोहळा प्रमुखांना महावस्त्र व रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संतांच्या पालखी मार्गावर ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती सोहळा प्रमुखांना दिली.

संबंधित पोस्ट

संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

अमृत दुर्गोत्सव 2025’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

vishwatmaklokswamivarta

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

महाड क्रांतीभुमीत भिमसृष्टी उभारण्यात यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  *चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापनदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले विनम्र अभिवादन* 

जिल्हा परिषद ठाणे येथे २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून पदोन्नत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा..