vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक भरती कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस सुरुवात

शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक भरती कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस सुरुवात

ठाणे,द प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया गुरुवार (दि. 3) पासून सुरू झाली आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहीर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर अपर आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, संपूर्ण पडताळणी प्रक्रिया शनिवार (दि. 5) पर्यंत पार पडणार आहे.
२४२१ रिक्त पदांपैकी १६०० उमेदवारांची यादी प्राप्तआदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा (PASA) व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 2421 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीशिवाय निवड झालेल्या प्राथमिक शिक्षक – 927, माध्यमिक शिक्षक – 421 आणि उच्च माध्यमिक शिक्षक – 252 अशा एकूण 1600 उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. यामध्ये पेसा क्षेत्रातील 459 तर नॉन-पेसा क्षेत्रातील 1141 उमेदवारांचा समावेश आहे.
संबधित उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रंची पडताळणी केली जात आहे. नाशिक विभागात सर्वाधिक 5 आरपी/पात्र 588 उमेदवार असून, त्याखालोखाल ठाणे विभागात 424, नागपूर विभागात 296 तर अमरावती विभागात 292 उमेदवार आहेत.
उमेदवारांसाठी आवश्यक सूचनासंबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार लागणारी कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (Self-attested) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. निर्धारित केलेल्या दिनांक व वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया”शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांच्या पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित राहावे,”असे आदिवासी विकास विभाग आयक्त लीना बनसोड यांनी कळविले आहे.
 चौकट: संवर्गनिहाय पदसंख्या
· पेसा क्षेत्र:o प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) : 196o प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) : 16o माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) : 94o माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) : 02o उच्च माध्यमिक शिक्षक : 151
 नॉन-पेसा क्षेत्र:o प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) : 593o प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) : 122o माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) : 302o माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) : 23उच्च माध्यमिक शिक्षक : 101

0000000000

संबंधित पोस्ट

महालक्ष्मी साजसजावट स्पर्धा उत्साहात स्लग- दोन हजार स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे –प्रधान सचिव श्रीकर परदेशी*‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज** वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन*

व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपये- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

कोणत्याही मदतीची गरज असल्यास, आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल! पालकमंत्री मंगल प्रभात लोढा