vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

  अहिल्यानगर, प्रतिनिधी : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पेट्रोल, डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रत्येक तालुक्यात इंधनाचे समानतेने वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले  जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, पुणे आणि मनमाड येथील इंधन डेपो निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना इंधनाचा अविरत पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

  इंधन वाटपावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पेट्रोल पंप परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना सुरळीत सेवा मिळणे आवश्यक असून पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. पुरवठा साखळी सक्षम ठेवणे तसेच नागरिकांना वेळेत इंधन उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्यावर भर देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

  बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल साठा, पुरवठा व्यवस्था, वाहतूक समन्वय तसेच विविध तालुक्यांतील इंधन उपलब्धतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. #इंधनपुरवठा #FuelSupply2026 #अहिल्यानगर #Ahilyanagar #जिल्हाप्रशासन #DistrictAdmin #पेट्रोलडिझेल

संबंधित पोस्ट

2 व 4 जून रोजी यलो अलर्ट जारी हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

vishwatmaklokswamivarta

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

एमएसएमई ॲवार्ड 2026′ साठी विविध 9 प्रवर्गांमध्ये नामांकने आमंत्रित

नवी मुंबई महानगरपालिका आंतरशालेय सांस्कृतिक चषक स्पर्धा जल्लोषात संपन्न सर्वोत्तम गुण संपादन करत ऐरोलीचे विबग्योर हायस्कूल सांस्कृतिक चषकाचे मानकरी