vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ. अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम

ड्रोनच्या साहाय्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा तयार जनगणना कार्यात डॉ. अमोल बागुल यांचा अभिनव उपक्रम

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल जनगणना उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या पूर्वतयारीचे काम वेगाने सुरू आहे. याच अंतर्गत प्रगणक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाधिष्ठित अभिनव उपक्रम राबविला आहे.

त्यां ना नेमून दिलेल्या प्रभागाचा अचूक व अद्ययावत नकाशा तयार करण्यासाठी त्यांनी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला. ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराचे हवाई छायाचित्रण करण्यात आले. त्याच्या आधारे प्रभागातील रस्ते, घरे, गल्ल्या, प्रमुख ठिकाणे तसेच भौगोलिक रचना यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. या माहितीच्या आधारे जनगणना कार्यासाठी उपयुक्त असा अचूक व अद्ययावत नकाशा तयार करण्यात आला.याप्रसंगी आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे घरांची अचूक नोंद, क्षेत्रनिहाय नियोजन तसेच घरभेटी घेणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे जनगणना प्रक्रियेतील अचूकता वाढण्यास मोठी मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनगणना कार्य अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न इतर प्रगणकांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासनाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता येईल.”या वेळी सहायक आयुक्त मेहेर लहारे, प्रभाग अधिकारी बाळासाहेब पवार, मास्टर ट्रेनर डॉ. संतोष देशमुख, रफिक देशमुख, पर्यवेक्षक अलका दहातोंडे, प्रगणक व कर्मचारी उपस्थित होते.

याविषयी बोलताना डॉ. बागुल यांनी सांगितले की, “जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास हे कार्य अधिक अचूक, सुलभ आणि परिणामकारक होऊ शकते. त्याच उद्देशाने ड्रोनच्या साहाय्याने नकाशा तयार करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला.”

अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातील या नाविन्यपूर्ण उपक्रमाची नागरिकांसह शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात चर्चा सुरू असून, डिजिटल भारताच्या दिशेने टाकलेले प्रभावी पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

 

#ड्रोननकाशा #DroneTechnology #Innovation

संबंधित पोस्ट

म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

कन्या सन्मान दिवस-मुला-मुलीत भेद करण्याची मानसिकता बदला- पालकमंत्री संजय शिरसाट

कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी-महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे संचालक (पणन) यांना निर्देश