vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अथर एनर्जी लि.च्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट,सामाजिक उत्तरदायित्व निधीतून महिलांचेआरोग्य, कुपोषण इ. क्षेत्रात योगदान देणार..

अथर एनर्जी लि.च्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट,सामाजिक उत्तरदायित्व निधीतून महिलांचेआरोग्य, कुपोषण इ. क्षेत्रात योगदान देणार..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- अथर एनर्जी लि. या कंपनीच्या माध्यमातून १० हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून महिलांचे आरोग्य, त्यांच्यातील रक्ताल्पता, कुपोषण अशा क्षेत्रात कामगिरी करु इच्छिते,असे कंपनीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना सांगितले.

अथर एनर्जी लि. च्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी भेट घेतली. भेटीप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, अथर एनर्जीचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी संजिवकुमार सिंग, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीकांत विश्वेश्वरन, प्रकल्प प्रमुख शेखर जी., जनसंपर्क अधिकारी अमोल मोहिते उपस्थित होते. श्री. सिंग यांनी प्रकल्प उभारणीच्या कामाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी प्रकल्प कार्यान्वीत करुन या भागातील युवकांना रोजगार द्यावा. प्रकल्पाच्या कामासाठी प्रशासन आपल्यास सहकार्य करेल. तसेच नियमित बैठकांमधून आपल्या अडचणींचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील असे सांगितले.

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, अथर एनर्जीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यातील ग्रामिणभागातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात योगदान द्यावे. श्री. सिंग यांनी सांगितले की, अथर एनर्जी कंपनी आपल्या सामाजिक उत्तर दायित्व निधीतून आरोग्य, कुपोषण, महिलांमधील रक्ताल्पता अशा विविध क्षेत्रात काम करुन आपले योगदान देऊ इच्छिते. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या उपक्रमांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल. संयुक्त प्रयत्नातून ग्रामिण भागातील महिलांचे आरोग्य, लहान बालकांचे कुपोषण अशा क्षेत्रात काम करुन अथर एनर्जीने आपले योगदान द्यावे,असे आवाहन केले.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

vishwatmaklokswamivarta

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत*  *पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद* 

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार

vishwatmaklokswamivarta