vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी पहिल्या टप्प्यात होणार 8 चार्जींग स्टेशन कार्यान्वित…

नवी मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी पहिल्या टप्प्यात होणार 8 चार्जींग स्टेशन कार्यान्वित…

       नवी मुंबई प्रतिनिधी –  प्रदूषण नियंत्रणावर भर देत पर्यावरणशील शहर म्हणून नवी मुंबई अग्रभागी असावे यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध पर्यावरणपूरक बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे.इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला चालना देऊन हवेचे प्रदूषण रोखणे, ध्वनी प्रदूषण कमी करणे, ऊर्जा बचत व ग्रीन हाऊस गॅसचा प्रभाव कमी करुन पर्यावरण संतुलनाकरिता इलेक्ट्रिक वाहने 2030 पर्यंत किमान 30% असावीत या केंद्र शासनाच्या धोरणान्वये उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष दिले जात आहे.

याविषयी राज्य शासनानेही फेब्रुवारी 2022 मध्ये या धोरणाचा अवलंब केला आहे. निती आयोग यांनी देखील सन 2030 पर्यंत 80% दुचाकी – तीन चाकी वाहने, 50% चारचाकी वाहने व 40% बसेस या इलेक्ट्रिक असण्याची संकल्पना मांडलेली आहे. त्यास अनुसरून या इलेक्ट्रिक वाहनांकरिता पुरेशा प्रमाणात चार्जींग स्टेशन्स उपलब्ध करून देण्याकडे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात आहे.

इलेक्ट्रिक वाहनांकरिता (ई व्ही – EV) चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी किमान 70 चौ.मी. इतकी जागा आवश्यक असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यालगतच्या उपयुक्त जागा अर्थात ले बे (Lay Bye), मॉल्स, विभाग कार्यालये, महानगरपालिका मुख्यालय, मंगल कार्यालये, उद्याने, वाहनतळे अशा गर्दीच्या जागांलगत तसेच महानगरपालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणानुसार शहरामध्ये 1 चौ.कि.मी. ग्रीडचा क्लस्टर प्रस्तावित असून त्यामध्ये 6 इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जींग स्टेशन (EVCS) प्रस्तावित आहेत. सध्या जागेची उपलब्धता लक्षात घेता एका क्लस्टरमध्ये 5 ईव्हीसीएस प्रस्तावित आहेत. अशाप्रकारे एकुण 24 ईव्हीसीएस क्लस्टर म्हणजेच 143 चार्जिंग पॉईंट्स उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना आपले इलेक्ट्रीक वाहन चार्ज करण्यासाठी उद्याने, मोकळ्या जागा, बस टर्मिनस, मॉल, वाणिज्य संकुले अशा वर्दळीच्या स्थळांजवळच इलेक्ट्रीक वाहन चार्जींग सुविधा उपलब्ध होणार आहे

  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरकारी खाजगी भागीदारी (PPP model) तत्वावर 24 ईव्हीसीएस क्लस्टर म्हणजेच 143 चार्जिंग पॉईंट्सपैकी सद्यस्थितीत परिमंडळ 1 साठी 4 चार्जिंग स्टेशन/ क्लस्टर तसेच परिमंडळ 2 साठी 4 चार्जिंग स्टेशन/ क्लस्टर असे एकूण 8 चार्जिंग स्टेशन/ क्लस्टर म्हणजेच 48 चार्जिंग पॉईंटस उभारण्यात येत आहेत. जागेच्या उपलब्धतेप्रमाणे नियुक्त एजन्सीला ईव्हीसीएस उभारण्याकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून M/s Kay Bee Batteries Private Limited & M/s Road Grid India Private Limited & M/s Delta Electronics India Private Limited या एजन्सीज् मार्फत चार्जिंग स्टेशन/ क्लस्टर स्वखर्चाने उभारणी करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेस रु.4 प्रती किलोव्हॅट इतके उत्पन्न मिळणार आहे. 15 व्या वित्त आयोगांतर्गत मिलीयन प्लस सिटी गटातील शहरांना हवा गुणवत्ता सुधारणा घटकाकरिता प्राप्त निधीमधून यासाठी रू. 2 कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे

     या अंतर्गत सर्व पब्लिक चार्जींग स्टेशन्स (PCS) यावरील जाहीरातीकरीता महानगरपालिकेने संबंधित एजन्सीला विद्युत रोषणाईसहीत मोकळी जागा नेहमी उपलब्ध करुन द्यावयाची आहे. सदर जाहिरातींपासून मिळणा-या उत्पन्नामध्ये महानगरपालिकेचाही हिस्सा असणार आहे. शिवाय या जागांवर महानगरपालिका विविध शासकीय योजना / उपक्रम यांच्या जाहीराती / होर्डींग्ज प्रदर्शित करु शकतील. पब्लिक चार्जींग स्टेशन क्षेत्राच्या ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध असल्यास महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीने नियुक्त एजन्सी पाकीटबंद खाद्यपदार्थ / पाणी इत्यादी विक्रीसाठी किऑक्स उभारु शकतील.

 अशाप्रकारे पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी पहिल्या टप्प्यात दोन्ही परिमंडळ क्षेत्रात प्रत्येकी 4 अशी एकूण 8 इलेक्ट्रिक वाहन सार्वजनिक चार्जींग स्टेशन उभारण्यात येत असून ही बाब नवी मुंबईची ओळख पर्यावरणशील शहर म्हणून दृढ करण्यामध्ये लक्षणीय भर घालणारी आहे

#NMMC #navimumbai

संबंधित पोस्ट

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी’ कायदा -तात्काळ करण्याच्या मागणीला जोर धरला !हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर  यांना अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत* नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन * मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांचा बैठकीत निर्धार

महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या वन स्टॉप क्रायसिस सेंटर (सखी केंद्र) तसेच शासकीय महिला आधारगृहांमधील सेवांचा, सखी केंद्रे आणि महिला आधारगृहांमधील निवारा, कायदेशीर मदत, आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे