vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधान परिषद प्रश्नोत्तरे-कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

विधान परिषद प्रश्नोत्तरे-कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर आणि नियमाप्रमाणे झाले पाहिजे. एखादी कंपनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अथवा नियमाप्रमाणे देत नसल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत श्रीमती उमा खापरे, सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, केंद्र शासनाकडून जानेवारी २०२५ पासून निधी प्राप्त न झाल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित राहिले होते. सध्या हा निधी प्राप्त झाला असून मे २०२५ अखेर पर्यंतच्या मानधनासाठीचा निधी जून महिन्यात वितरित केलेला आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी याबाबतच्या एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.

0000

संबंधित पोस्ट

शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृतीची आंदोलनाद्वारे मागणी !

vishwatmaklokswamivarta

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत

जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी  शेतकऱ्यांच्या वेदना जाणून पारदर्शकपणे गतीने काम करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप, प्रिंटर्सचे वितरण