vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश-विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

मुंबई, प्रतिनिधी : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले

पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आसावरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आसावरी हिला बोलवून तिच्याशी बोलून तिच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महानगरपालिकेत निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले. तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रकिया पूर्ण केली जाणार आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

यशदा पुणे येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉटर प्लस मानांकनाविषयी सादरीकरणाचा मान*

पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई८ टिप्पर जप्त, १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात ; ८ आरोपींवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांचा लाडका विभाग हा कौशल्य विकास विभाग कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे विधान परिषदेत प्रतिपादन..

आदर्श आचारसंहितेतील प्रस्ताव छाननी समितीमार्फतच सादर करावेत 

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न..

आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta