vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठीपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा

मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठीपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा

ठाणे, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्तन, मूर्धा, नवघर, घोडबंदर आणि काजूपाडा येथील जुने आदिवासी पाडे, आगरी व कोळी वसाहती तसेच जुन्या गावांमधील वाढीव बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आगामी गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून पाहणी दौरा करणार आहेत.

स्थानिक नागरिकांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या बांधकामांच्या प्रश्र्नांवर तात्काळ व योग्य तोडगा काढण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री महोदय प्रामुख्याने खालील भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत:

· उत्तन आणि मूर्धा : येथील स्थानिक वसाहतींमधील वाढीव बांधकामांची पाहणी.· नवघर : परिसरातील अनधिकृत व वाढीव बांधकामांचा आढावा.· स्टील असोसिएशन : जुन्या गाळ्यांची उंची वाढविणेबाबत धोरण ठरविण्याबाबत चर्चा व पाहणी.· घोडबंदर आणि काजूपाडा : जुने आदिवासी पाडे, आगरी-कोळी वसाहती आणि जुनी गावे येथील वाढीव बांधकामांच्या नियमितीकरणाबाबत प्रत्यक्ष स्थलदौरा

या पाहणी दौऱ्यामुळे मिरा-भाईंदर परिसरातील जुन्या वसाहतींमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेचे जाहीर आवाहन

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याकरिताजिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन**पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अखेर  रुग्णालयातून डिस्चार्ज…

vishwatmaklokswamivarta

.म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई