vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरावयाचे बाकी असेल तर त्यांना दहावी / बारावी परीक्षेचे हॉल तिकीट दिले जात नाही अशा काही तक्रारी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. सदरची बाब अत्यंत गंभीर असून यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते व त्याच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो.

तरी या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी शाळा व्यवस्थापनांना नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने सूचित करण्यात येते की, एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरणा करणे पालकांच्या काही अडचणींमुळे शक्य होत नसेल तर त्यांच्याशी संवाद साधून शैक्षणिक शुल्क भरणा करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यांना शुल्क भरता यावे याकरिता पर्याय उपलब्ध करुन द्यावेत. तथापि दहावी / बारावी परीक्षेचे हॉल तिकीट न देता त्यांची अडवणूक करु नये. शाळा सोडताना शाळेचा दाखला देण्यापूर्वी शैक्षणिक शुल्क भरून घेण्याचा पर्याय शाळा व्यवस्थापनाकडे उपलब्ध असताना अशा प्रकारे हॉल तिकीट देताना अडवणूक करणे अयोग्य आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अशा प्रकारची कोणतीही तक्रार करावयाची असल्यास संबधित पालकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांस 022-27567043 अथवा उपआयुक्त शिक्षण श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांस 022-27567067 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्गम भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावी- ॲड. आशिष जयस्वाल

निलंगा नगरपरिषदेसाठी 67.37, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी 80.51 टक्के मतदान,उदगीरमध्ये तीन जागांसाठी 58.22 टक्के मतदान,जिल्ह्यातील 4 नगरपरिषद, 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी

vishwatmaklokswamivarta

२० जूनपर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनपी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य