vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

२० जूनपर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनपी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

२० जूनपर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनपी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

नांदेड द प्रतिनिधी:- जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी २० जून २०२६ पर्यंत आपली Farmer ID (फार्मर आयडी) नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासनाच्या २०२५ मधील निर्णयानुसार १५ एप्रिल २०२५ पासून पी.एम. किसानसह इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांची Farmer ID निर्मिती व अद्ययावतीकरणाचे काम प्राधान्याने सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण ७ लाख ५४ हजार ५१८ भूधारकांपैकी १ लाख ५१ हजार ३८ भूधारकांनी अद्याप AgriStack मध्ये नोंदणी केलेली नाही. तसेच ३ लाख ६९ हजार ३८४ पी.एम. किसान लाभार्थ्यांपैकी ३२ हजार ५०४ लाभार्थ्यांनीही AgriStack मध्ये नोंदणी केलेली नसल्याचे समोर आले आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उर्वरित सर्व शेतकऱ्यांची Farmer ID नोंदणी २० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, Farmer ID नोंदणीबाबत जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर व्यापक प्रचार व प्रसिद्धी मोहीम राबविण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देऊन वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ जिल्हा स्त्री रुग्णालय येथे थेट प्रक्षेपणाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भातअभ्यास अहवाल तयार करावा- वनमंत्री गणेश नाईक

ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार 

महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅकर्स बस वाहतूक महासंघ तसेच ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने ट्रॅक, टेम्पो, टँकर, बस,ट्रेलर,प्रवासी कार, टॅक्सी यांच्या समस्याची सरकारने दखल न घेतल्यास उग्र आंदोलन छेडणार 

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१४) जनसुनावणी

vishwatmaklokswamivarta

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.