vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.

 

राज्य प्रतिनिधी

डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते ‘अर्बन अड्डा 2025’चे उद्घाटन आणि सायकल चालविणे विषयावरील पुस्तकांचे प्रकाशन“सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम प्रकार असून प्रदूषण कमी करण्‍यासाठी चांगला उपाय,” : केंद्रीय मंत्री ,केंद्रीय कामगार आणि रोजगार, तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत ‘अर्बन अड्डा 2025’ या परिषदेचे उद्घाटन केले. या तीन-दिवसीय परिषदेत शहरांच्या शाश्वत भविष्यासंदर्भात विचारविनिमयासाठी युवा, तज्ज्ञ आणि नेते एकत्र आले आहेत.

आपल्या भाषणात डॉ. मांडवीय म्हणाले, “सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाच्या शाश्वततेलाही हातभार लागतो. सायकल चालविणे म्‍हणजे, प्रदूषण कमी करण्‍यासाठी चांगला उपाय आहे.”

जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात डॉ. मांडवीय यांच्या हस्ते दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली.1. सायकलिंग, चिल्ड्रेन ॲण्ड सिटीज्, लेखिका – डॉ. भैरवी जोशी2. रोड टू सायकल2स्कूल, लेखक – डॉ. भैरवी जोशी आणि आर्किटेक्ट कुश पारिख सक्रीय गतिशीलता, आरोग्यदायी जीवनशैली आणि मुलांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरांमधील जागेच्या सायकलस्नेही पुनर्नियोजनाची गरज मांडतात.कार्यक्रमाच्या शेवटी दंतचिकित्सक आणि बीवायसीएस इंडिया फाउण्डेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक-संचालक डॉ. भैरवी जोशी, यांनी सायकल चालविण्यासाठी आपले आग्रही समर्थन असल्याचे सांगून आभार प्रदर्शन केले.अर्बन अड्डा 2025, 3 जून ते 5 जून या तीन दिवसांत होत असून, यामध्ये हवामान बदलाचा सामना करू शकणारी शहरे, लिंगविषयक मुद्दे आणि वाहतूक, स्वच्छ हवा, पाणी, कचरा व्यवस्थापन आणि समावेशी परिवहन आदी विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये पुढील सत्रांचा समावेश आहे.

युवक अड्डा – शहरी परिवर्तनात युवकांचा सहभाग वाढविणारे व्यासपीठसायक्लोथॉन – जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने 100+ सायकलस्वारांसह सक्रिय गतिशीलतेचा प्रचार

अर्बन अड्डा चित्रपट महोत्सव (यूएएफएफ 25) – 4 जून रोजी लघुपट महोत्सवाचे आयोजन. यामध्ये हवामान बदलाचा सामना आणि शहरी नवोन्मेष याविषयी लघुपटांचे प्रदर्शन केले जाईल. त्यानंतर अभिनेत्री पूजा बेदी यांच्या विशेष उपस्थितीत खास समारंभ होईल.

संवादात्मक सार्वजनिक कला प्रदर्शन – कलाकार सागर सिंग यांच्या नेतृत्वाखाली कला, हालचाली आणि शाश्वततेचे सृजनशील प्रदर्शन आयोि‍जत केले आहे.

संबंधित पोस्ट

29 ऑक्टोबरला पेंशन अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

छत्रपतीसंभाजीनगरःपर्यटन’, कॉफीटेबल बुकचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विमोचन

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

बॅंकांची जिल्हा सल्लागार व संनियंत्रण समिती बैठकसन २०२६-२७ साठी वित्त पुरवठ्यात २५०० कोटी रुपयांची वाढ

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी अशोक काकडे

युवक युवतींना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta