पावसामुळे सिंचन विहिरी कोसळल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या -विविध मागण्यांचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे केंद्रीय कृषी कृषीआणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन उपतालुकाप्रमुख ठोंबरेंनी दिले दिल्लीला जावून कृषी मंत्र्यांना निवेदन
पावसामुळे सिंचन विहिरी कोसळल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या -विविध मागण्यांचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे केंद्रीय कृषी कृषीआणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन उपतालुकाप्रमुख ठोंबरेंनी दिले दिल्लीला जावून कृषी मंत्र्यांना निवेदन
जालना, (प्रतिनिधी)-शेतकर्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात भोकरदन उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी जिल्ह्यातील शेतकर्यांच्या समस्या त्यांनी निवेदनाव्दारे मांडल्या आहेत.महाराष्ट्र राज्यातील मनरेगा योजनांच्या नियमांमध्ये बदल करून, देण्यात येणारी वैयक्तिक लाभाचे अनुदान थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करावे आणि या योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात सिंचन विहिरीचे खोदकाम चालू असताना
झालेल्या अति पावसामुळे विहिरी पूर्णपणे कोसळल्या/खचल्या त्याची नुकसान भरपाई यावी. आणि जालना जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत समित्यांमध्ये यायोजने अंतर्गत देण्यात येणारे अनुदान गेल्या अडीच वर्षांपासून शेतकर्यांना देण्यात आलेली नाही ते तात्काळ देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी शिवसेना भोकरदन (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय कृषी कृषी आणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन दिले आहे.
उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, भारत हाकृषी प्रधान देश आहे. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरअवलंबून आहे. हजारो अडथळ्यांना तोंड देऊन शेतकरी पिकापासून धान्यउत्पादित करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. संपूर्ण देशवासीयांना अन्न पुरवण्याचे काम फक्त शेतकरीच करतो. देशाची अर्थव्यवस्था चालवणार्याशेतकर्यांसाठी सरकारकडे मनरेगा सारख्या चांगल्या योजना आहेत, ज्या विहीरगोठा यासारख्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी करण्यासाठी फायदेशीर ठरतात,
परंतु त्याचा पूर्ण लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाहीत.तालुका पंचायत समिती स्तरावर अर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रिये पासून पैसेघेतले जाते तर पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येकशेतकर्याकडून किमान १ लाख रुपये जमा केले जाते. शेतकर्यांच्या प्रगतीतअडथळा आणणार्या अनेक गोष्टी आहेत. जर सरकार शेतकरी बांधवांच्याविकासासाठी, मनरेगा योजने अंतर्गत वैयक्तिक फायद्यासाठी आर्थिक मदत देतआहेत आणि ती देऊ इच्छित आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पंचायत समितीमध्ये शेतकर्यांसोबत अशा लज्जास्पद घटना घडत आहेत. पंतप्रधान मोदीजींचे ध्येय शेतकर्यांची प्रगती करण्याचे आणि आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी, सर्व फायदे शेतकर्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत.म्हणून, महाराष्ट्रातील मनरेगा योजनांचे नियमात बदलून करून वैयक्तिकलाभासाठी दिले जाणारे अनुदान थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करावे.जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि इतर तालुका पंचायत समित्यांच्या विद्यमानआणि तत्कालीन अधिकार्याने २०२४ – २०२५ या वर्षासाठी मनरेगा योजनांअंतर्गत सिंचन विहीर, गोठा आणि सारख्या अन्य योजनांच्या अर्जांना मंजुरी
देण्यास जाणीवपूर्वक दीरंगाई केल्यामुळे, सिंचन विहिरींचे खोदकाम वेळेतसुरू न झाल्यामुळे आता होत असलेल्या मुसळधार पावसामुळे, सिंचन विहिरीतपूर्णपणे बाहेरून माती भरून विहिरी खचत जमिनीत बुडाल्या, शेतकर्यांचेलाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले , शेतकर्यांच्या झालेल्या आर्थिकनुकसानीसाठी तालुका पंचायत समितीचे तत्कालीन आणि सध्या स्थित अधिकारीजबाबदार आहेत. अशा कर्तव्यात कसूर करणार्या आणि शेतकर्यांना अनावश्यकगोष्टीचा त्रास देणार्या अधिकार्याची इतर प्रशासकीय विभागांच्याचांगल्या वरिष्ठ अधिकार्यांमार्फत चौकशी करत त्यांच्याकडून नुकसानीचीभरपाई वसूल करावी, अन्यथा शेतकर्यांना सरकारी तिजोरीतून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी.जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, अंबड, मंठा, परतूर
आणि घनसावंगी तालुक्यातील सर्व तालुका पंचायत समित्यांमध्ये मनरेगायोजनांतर्गत शेतकर्यांनी सिंचन विहिरी,गोठा आणि इतर वैयक्तिक लाभांसाठीअर्ज केल्यानंतर, संबंधित अधिकार्याकडून अडीच अडीच वर्षे परवानगी मिळत नाही, ती तात्काळ देण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत समितीक्षेत्रातील शेतकर्यांनी मनरेगा योजने अंतर्गत जे काही वैयक्तिक लाभघेतले त्याचे काम शेतकर्यांनी सावकारी कर्ज काढून केल्यानंतरही लाभार्थ्यास मिळणारे अनुदान दोन-तीन वर्षे उलटूनही अध्याप पर्यंतमिळालेले नाही, कृपया ते त्वरित देण्याचे आदेश द्यावे. मनरेगा सारख्या योजनांचा उद्देश खूप चांगला आहे पण अशा आ अकर्तव्यदक्ष आणि शेतकर्यांना वेठीस धरणार्या काही अधिकार्यांमुळे त्याचे फायदे शेतकरी बांधवांपर्यंत
पोहोचत नाहीत. अन्न पिकवत संपूर्ण देशातील लोकांचे पोट भरणार्या शेतकरीबांधवांच्या पिकांना चांगला भाव देऊन सरकार आणि प्रशासनाच्या पातळीवरसन्मानाची वागणूक मिळावी.राज्यातील आणि जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की तुम्ही त्यांचे दुःख आणि वेदना घेत वरील सर्व गोष्टींचागांभीर्याने विचार करून त्यावर तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीहीभोकरदन उपतालुकाप्रमुख ठोंबरे यांनी केली आहे.