vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु

ठाणे, प्रतिनिधी:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 पासून “प्रथम अर्ज, प्रथम लाभ” या तत्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. यासदंर्भात क्षेत्रीयस्तरावर व्यापक प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) यशस्वी अंमलबजापणी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासोबतच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी खरीप हंगाम लक्षात घेता दि.15ते 30 जून 2025 या कालावधीत क्षेत्रीय स्तरावर गावपातळीपर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे.

तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवर जास्तीत जास्त संख्येने https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करून फलोत्पादनविषयक विविध योजनांचा लाभ घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कसनसूर फळ रोपवाटिका बनणार आदर्श केंद्र – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा आढावा दुर्गम भागातही फळबाग हब साकारण्याचा प्रयत्न, जिल्हा प्रशासनाचा पुढाकार..

कौशल्य विषयक प्रशिक्षण उपक्रमांतून देहविक्रय करणा-या महिलांसाठी विकासाच्या नव्या संधी..

दुर्गम भागातील रस्त्यांबाबत तातडीने उपाययोजना-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती 

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 31.42 टी.एम.सी. पाणीसाठा…

लिंकिंग केल्यास कठोर कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा वेळेत व सुरळीत पुरवठा करण्याचे आदेश