vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

ठाणे, प्रतिनिधी):- राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता दि.15 जून 2025 ते दि.30 जून 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये 1) कृषी सहाय्यकांमार्फत प्रत्येक गावातील या दोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विशेष मेळावा आयोजित करून योजनेची माहिती देण्यात येणार आहे. या मेळाव्याकरिता नोंदणीकृत सूक्ष्म सिंचन वितरक व सेवा व सेतू केंद्रांचे प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच मोहीम स्वरुपात कॅम्प घेऊन शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. 2) सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या पूरक अनुदानाच्या योजनांची माहिती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. 3) अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याकरिता स्थानिक वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी इ. च्या माध्यमातून व्यापक प्रचार, प्रसिद्धी करण्यात येणार आहे. 4) महाडीबीटी पोर्टलवर जिल्हानिहाय / तालुकनिहाय दर्शविलेल्या लक्षांकाच्या प्रमाणात या दोन्ही प्रवर्गातील पुरेसे अर्ज उपलब्ध नसतील तर अशा तालुक्यांमध्ये/मंडळामध्ये/गावामध्ये व्यापक प्रसिद्धी देऊन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 5) राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारकांना 55% व इतर भूधारकांना 45% अनुदान अदा करण्यात येते. तसेच शासन पत्र क्र. डीबीटी-0324/प्र.क्र.71/14अ. दि.10 जून, 2024 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अदा करण्यात येईल. उर्वरीत 10% / 15% अनुदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमधून अदा करुन एकूण 90% अनुदान अदा करण्यात येईल

तरी राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विशेष मोहीम योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टलरोड सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्वप्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत बी.जी.देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मॉडेल सोलर व्हिलेज” साठी जिल्ह्यात १५ गावात होणार स्पर्धा – जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील-१ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

शेतकऱ्यांनी विमा संरक्षित ई-पीक पाहणी करुन घ्यावी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व समता पंधरवड्यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta