vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व समता पंधरवड्यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेचे आयोजन..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व समता पंधरवड्यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेचे आयोजन..

ठाणे, प्रतिनिधी:- महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांच्यामार्फत समता पंधरवडा निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अर्जदार/विद्यार्थी यांना जात वैधता प्रमाणपत्राची कार्यपध्दती व जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे कागदोपत्री पुराव्यांबाबत जागृकता/माहिती नसल्याने व विहित कालावधीमध्ये संबंधित समितीकडे अर्ज सादर न केल्यामुळे मागासवर्गीय व्यक्तीस शिक्षण, सेवा, निवडणूक व इतर संविधानिक आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागते.

यास्तव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे या कार्यालयाच्या वतीने समता पंधरवड्याचे औचित्य साधून दि.4 एप्रिल 2025 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे कार्यालयात अर्ज केले आहेत व त्यांना त्रुटीची पुर्तता करण्याबाबत समिती मार्फत दूरध्वनी, SMS व त्रुटीची पत्रे प्राप्त झालेली आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी दि.4 एप्रिल 2025 रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, दत्तवाडी बस स्टॉप जवळ, खारेगांव, कळवा, ठाणे येथे त्रुटी पुर्ततेसह सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे, असे अवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर· सभापती, सदस्य पदांची आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला ; राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला!

vishwatmaklokswamivarta

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ..

३४ हजार ७३२ कोटींच्या विकास आराखड्याला गती;सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· कुंभमेळ्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; विभागांनी जबाबदारीने काम करा