vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला!

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला!

मुंबई प्रतिनिधी-

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत  जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. या चर्चेअंती आता भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणूक 2026 साठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची  राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा आता कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे गटासाठी (Shinde Camp) फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आता शिवसेनेला जास्त जागा देऊ केल्या हाेत्या. परंतु, जागावाटपच्या या सूत्रावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 मुंबईत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचं वेट ॲंड वॉच

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून अद्याप एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून वेट ॲंड वॉच धोरण अवलंबण्यात आल्याची चर्चा आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, पनवेलमधील जागावाटपाचा पेच कायम आहे. उद्यापर्यंत या सर्व ठिकाणचे जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान-आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर  झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर,नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर,उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत,अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026 मतदान- 15 जानेवारी 2026 -मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

00000

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तर :रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नसरापूर बलात्कार व खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती!

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला वाहनांसह बचाव साहित्य महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहने सुपूर्द

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या पंढरपूर आवृत्ती 2025 मध्ये 5000 हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग;

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि.२१)बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामुहिक योगासने

मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी खुशखबर- महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली, गो अर्ली ही सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानपरिषदेत केली.