vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनी विमा संरक्षित ई-पीक पाहणी करुन घ्यावी

शेतकऱ्यांनी विमा संरक्षित ई-पीक पाहणी करुन घ्यावी

रायगड( प्रतिनिधी :-रायगड जिल्ह्यामध्ये आंबिया बहार सन-2024-25 करिता युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत आंबा व काजू फळपिकांसाठी फळपीक विमा योजना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

दि.12 जून, 2024 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषानुसार या विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणे करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे. परंतु फळपिकांची ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्व्हे (DCS) मोबाईल अॅपद्वारे केलेली नाही त्यांनी दि.25 एप्रिल 2025 पर्यंत विमा संरक्षित क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण करुन घ्यावी. अन्यथा योजनेच्या निकषानुसार ई-पीक पाहणी नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभा दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

००००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणार!माहिती तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी करणार- मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा…

vishwatmaklokswamivarta

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा… सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

रियल इस्टेट क्षेत्राने गरिबांना किफायतशीर घरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करावी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान..