vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ…

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ…

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ रविवार, दि. 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता “सैनिकी मंगल कार्यालय”, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे होणार आहे

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा ध्वजदिन निधी संकलन समिती, बुलडाणा यांच्या हस्ते होणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ध्वजदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित, पत्रकार बांधव, तसेच उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्या कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सशस्त्र सेना ध्वजदिन हा राष्ट्ररक्षकांच्या सन्मानाचा दिवस असून, या दिवशी जमा होणारा निधी हुतात्मा आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजदिनाला सन्मान द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त-राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात खरीपसाठी मुबलक #खत साठा उपलब्ध• शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta