vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण

 

        बुलढाणा, प्रतिनिधी- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजागार युवक व युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय, म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. 9 ते 13 डिसेंबर 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे.

     या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा सुशिक्षित बेरोजगार यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे. या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कुट आणि गाय म्हैस पालनाचे तंत्र व प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहितीचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे

     प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान 5 वी पास, वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाईल. प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी दि. 9 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालय जवळ, चिखली रोड, बुलडाणा यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय त्यांना 8275093201/9011578854 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दात्यांना जुलै 2025 साठीचा जीएसटीआर -3 बी दाखल करण्याच्या अंतिम कालमर्यादेला मुदतवाढ

राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची दि.३० एप्रिल पर्यंत संधी उपलब्ध 

मान्सून कालावधीत प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे- पालकमंत्री शंभूराज देसाई

ग्रामपंचायत सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण जाहीर

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी;जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta