vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

काँग्रेस नेते राहुलगांधी यांच्या दिल्ली तीन निवासस्थानी- इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची टीका

 काँग्रेस नेते राहुलगांधी यांच्या दिल्ली तीन निवासस्थानी- इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची टीका

राज्य प्रतिनिधी-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावरील शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’तील पक्षनेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता

स्नेहभोजनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप गट) अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, द्रमुकच्या नेत्या कनिमोळी, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी, सपा नेते अखिलेश आणि रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती, डाव्या आघाडीचे डी. राजा नेते राहुल गांधी यांच्या घरी उपस्थित होते. यावेळी ठाकरे सातव्या रांगेत बसल्याचे फोटोंवरुन दिसते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावरील शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’तील पक्षनेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरील आरोपांचे सादरीकरण पुन्हा करुन दाखवले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना, भाजप नेत्यांनी ठाकरेंवर बैठक व्यवस्थेवरुन निशाणा साधला आहे

भाजपची टीका,भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘एक्स’वरुन टीका करताना म्हटलं आहे, की “उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, तेव्हा त्यांना आणि ‘मातोश्री’ला किती सन्मान होता. देशातील भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करत. 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते.” याची आठवण उपाध्येंनी करुन दिली.

पुढे उपाध्ये म्हणतात की, “कट टू 2025, आता पहा, महाविकास आघाडीत आल्यापासून राहुल गांधी, सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले? उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदरांजली वाहण्यास कुणी काँग्रेस नेता गेला? उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरेंचा काँग्रेसने हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला? उत्तर नाही. दरवर्षी आता उद्धव ठाकरेच दिल्लीत राहुल सोनिया गांधींना भेटायला जातात” अशी टीका केशव उपाध्येंनी केली आहे.

000000

संबंधित पोस्ट

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी “एक गाव एक गणपती”संकल्पनेनुसार शांतता व सौहार्दपूर्ण  वातावरणात उत्सव साजरा करावा” _पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श    प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !