vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजनअधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे   

राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजनअधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे

 ठाणे, प्रतिनिधी :- शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य    विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026’ आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचा विस्तार राज्यस्तरासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध स्तरांवर पारितोषिके जिंकण्याची संधी उपलब्ध आहे.    स्पर्धेचे अर्ज अकादमीच्या संकेतस्थळावर https://ganeshotsav.pldmka.co.in या ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार, दि.7 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.

   या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियेाजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी केले आहे.

     या महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरावर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 असून ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

      विजेत्या मंडळांना जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल.

   याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे प्रसिद्ध करावीत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी केले आहे.

0000000

 

संबंधित पोस्ट

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या खंडोबा जत्रेला सुरवात, या निमित्त रंगला कुस्त्यांचा सामना.

vishwatmaklokswamivarta

दिपावली पुजन* “मुहूर्त” दि. १७|१०|२०२५ शुक्रवार…. एकादशी सह    *वसुबारस* सायं ६.नंतर सवत्स गाईचे पूजन करावे.(गुळाचा नैवेद्य दाखवला)

vishwatmaklokswamivarta