vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई, प्रतिनिधी : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’ (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत प्रदर्शनाचे मे. फेअरफेस्ट मीडिया यांच्याद्वारे आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे प्रदर्शन ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले.महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील ‘टीटीएफ’च्या माध्यमातून विविध घटकांपर्यत पोहोचविण्यात आली. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होणार आहे, या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने १०० चौरस फूट दालन उभारुन सहभागी होऊन महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत ३५ हून अधिक भागधारकांना महाराष्ट्र दालनात सामावून घेऊन पर्यटन सेवांविषयी माहिती पर्यटक / व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. यात टूर ऑपरेटर, रिसोर्ट, कृषी पर्यटन केंद्र, वन्यजीव पर्यटन ऑपरेटर, कॅराव्हॅन पर्यटन ऑपरेटर, सहल मार्गदर्शक आणि अन्य पर्यटन व्यावसायिकांचा सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र दालनाला पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांतील घटकांनी भेट दिली, तसेच महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक जाणून घेण्याची रुचीही दाखविली.

या प्रदर्शनामुळे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इत्यादी माहिती पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात आली. या दालनात पर्यटन स्थळांची माहिती व पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाल्याने भागधारकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.

टीटीएफ प्रदर्शनात दरवर्षी ५०० प्रदर्शक आणि १० हजारांहून अधिक भागधारक सहभाग घेतात. या ट्रॅव्हल ट्रेड फेअरमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी देश-विदेशातील अनेक भागधारकांची दालने असतात. देश-विदेशातील पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करणे व पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

या प्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनाला ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’ यांच्याकडून सर्वोत्कृष्ट दालनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख अधोरेखित केली आहे.

संबंधित पोस्ट

मनोज रानडे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta

मतदान यंत्राच्या प्रथम स्तर तपासणी कार्यवाहीची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून पाहणी 

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

हिंद की चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी सचखंड पब्लिक स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या“डिजिटल व्हॅन” उपक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटन संपन्न

राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी   – आयुक्त डॉ. किरण जाधव…

vishwatmaklokswamivarta