vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण…

राज्य प्रतिनिधी –

भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. देशाला तोडणाऱ्या विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसह देशाच्या अखंडतेला ध्यास धरावा असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतीय जनतेचा फाळणीचा संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. फाळणीच्या काळात भारतीयांनी भोगलेल्या यातना, विस्थापन आणि बलिदानांच्या स्मृतीचे स्मरण व्हावे आणि भावी पिढीत सामाजिक सलोख्याची भावना दृढ व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट २०२१ पासून हा दिवस पाळण्याची घोषणा केली होती.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देऊन रोजगार आणि उद्योगास आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आयटीआयमध्ये अनेक सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानसोबतच सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याचे भान असणे आवश्यक असल्याने मंत्री श्री. लोढा यांनी आयटीआयमध्ये दरमहा एक सामाजिक जबाबदारी वृद्धिगत करणारा कार्यक्रम आयोजित करावा असे निदेश दिले होते. याच श्रुंखलेतील एक भाग म्हणून ऑगस्ट महिन्यात विभाजन विभीषिका स्मरण दिवस पाळण्यात आला. त्यानुसार राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयच्या सुमारे एक हजार संस्थांमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण करण्यात आले. विविध संस्थांमध्ये फाळणी संदर्भात चित्र प्रदर्शन, व्याख्याने आणि नाटक सादर करून विद्यार्थ्यांना भारताच्या त्या काळ्या अध्यायाशी परिचित करण्यात आले. तसेच भावी पिढीत सामाजिक समरसता अबाधित राहून विघटनाच्या विचारापासून दूर राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

**

संबंधित पोस्ट

आकाशवाणीच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्राच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉन सह विविध कार्यक्रमांचं आयोजन

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखांहून अधिक नागरिकांशी जनसंवाद

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग अकराव्यांदा मानकरी..

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…