vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जामिया उर्दू अलीगढची जालना कॉलेज ऑफ सोशल वर्कला अध्ययन केंद्राची मान्यताअदीब व अदीब-ए-माहिर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

जामिया उर्दू अलीगढची जालना कॉलेज

ऑफ सोशल वर्कला अध्ययन केंद्राची मान्यताअदीब व अदीब-ए-माहिर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

जालना (प्रतिनिधी) : देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था जामिया उर्दू अलीगढ यांनी जालना कॉलेज ऑफ सोशल वर्क, करमवीर प्रतिष्ठान, जालना या संस्थेला माहिती व मार्गदर्शन केंद्र तसेच अधिकृत अध्ययन केंद्र म्हणून मान्यता प्रदान केली आहे अशी माहिती कर्मवीर प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय लाखेपाटील यांनी दिली असून या केंद्रामार्फत अदीब (माध्यमिक समकक्ष) आणि अदीब-ए-माहिर (उच्च माध्यमिक समकक्ष) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जामिया उर्दू अलीगढकडून या अध्ययन केंद्राला जेयूए-११९३ हा अधिकृत केंद्र क्रमांक देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांना भारत सरकारकडून केंद्रीय शासकीय सेवांमधील रोजगाराच्या उद्देशाने मान्यता प्राप्त आहे.

संस्थेच्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमांच्या परीक्षा दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात संगणकीय पद्धतीने घेतल्या जातील. परीक्षा झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांत निकाल जाहीर केला जाईल, तर निकालानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांची गुणपत्रके संबंधित अध्ययन केंद्राकडे पाठविण्यात येतील. उर्दू विषयातील हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास इच्छुक विद्यार्थी व पालकांनी रामनगर, जालना सहकारी साखर कारखान्याजवळील जालना कॉलेज ऑफ सोशल वर्क अथवा जेडीसीए कॉम्प्लेक्स नरिमन नगर जुना जालना येथील कार्यालयात संपर्क साधून प्रवेश व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच संपर्कासाठी खालील क्रमांक संजय देशमुख – ९३७३१६५०६०, रमेश गजर – ९८३४५६६२५८ / ९४२१६४९६८२, अनिल वाघमारे – ९४२१६४९६८२, राधाकृष्ण देशमुख – ९०२२८९८४३२, किशोर ढेकळे 9420142929 या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’  

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कुर्ला स्टेशन जवळ रियल ज्यूस चे वाटप

नाबार्डचा १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा-जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर क्षेत्रात काळी-पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षांच्या भाडेदरात वाढ सुधारित दर 1 सप्टेंबरपासून लागू…

भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta