vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

सातारा  इ. 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून टॉप क्लास एज्युकेशन इन स्कुल फॉर इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्टुडंट अंडर प्रधानमंत्री यशस्वी या योजनेअंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी 9 वी ते 10 वी साठी रु.75 हजार व इ. 11 वी ते 12 वी साठी रु. 1 लाख 25 हजार इतकी वार्षिक आर्थिक सहाय्य शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी व गणवेश इ. साठी देण्यात येणार आहे सदर योनेसाठी विद्यार्थ्यांची निवड हि गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असून आर्थिक सहाय्य डीबीटी व्दारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे.

 सदर योजनेचा लाभ सातारा जिल्ह्यामधील निवडक शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून सदर शाळांची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सातारा यांचेकडे सुपुर्द करण्यात आलेली आहे. तसेच सदर यादीमध्ये नमूद शाळेतील मुख्याध्यापकांना, प्राचार्य यांनी आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एकूण 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्याथ्यांचे अर्ज सदर योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता https://scholarships.gov.in या पोर्टलवर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरुन घ्यावेत असे अवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

समीर गायकवाड’सारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?समीर गायकवाड यांच्या श्रद्धांजली सभेत हिंदुत्वनिष्ठांचा संतप्त प्रश्न..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम* *वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे* — *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योग घटकावर कारवाई करणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

31 ऑक्टोंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta