vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित..

आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित..

मुंबई, प्रतिनिधी : माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज ‘आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित करण्यात आला.

या प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, उपसंचालक गोविंद अहंकारी, विशेष कार्य अधिकारी इर्शाद बागवान तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विशेषांकामध्ये शिवकालीन गडकिल्ले, शस्त्रे, पत्रव्यवहार, चलन, जलव्यवस्थापन अशा विविध विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज, विचार आणि आदर्श आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, हेच या विशेषांकाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या मनोगतामध्ये नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांनी स्वतः रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग व मूर्ती मंत्री ॲड. शेलार यांना भेटस्वरूप दिली.हा अंक महासंवाद – https://mahasamvad.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे.

009000

संबंधित पोस्ट

१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान”छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !

पालकमंत्री यांचा अतिवृष्टीग्रस्त भागांना दौरा; तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश    – ना.मकरंद पाटील

महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

vishwatmaklokswamivarta