vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रेल्वेच्या अधिकृत कॅन्टीनमधून प्रवाशांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवा,कंत्राटदारावर तात्काळ कडक कारवाई करा खासदार नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रबंधकांना निवेदन..

रेल्वेच्या अधिकृत कॅन्टीनमधून प्रवाशांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवा,कंत्राटदारावर तात्काळ कडक कारवाई करा खासदार नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रबंधकांना निवेदन..

 

ठाणे प्रतिनिधी – ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील ऑरिजिन या रेल्वेच्या अधिकृत कॅन्टीनमध्ये प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांच्या निर्देशानुसार सेंट्रल रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य संजीव कुलकर्णी व शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आले. याची गंभीर दखल घेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

ठाणे रेल्वे स्थानकातील कॅन्टीन व किचन परिसर अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असून अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच मुदत संपलेली (Expired) शीतपेये व इतर खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे, किड लागलेला व सडका भाजीपाला वापरला जात असल्याचे तसेच वारंवार वापरलेले जळके तेल अन्न शिजवण्यासाठी वापरले जात असल्याचेही निरीक्षणात आल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

नित्कृष्ट दर्जाचे खाद्य, कॅन्टीनमधील पंखे बंद असल्याने उकाडा व कोंदट वातावरण निर्माण झाले असून परिसरात दुर्गंधी पसरलेली असल्याचेही पाहणी दौऱ्या दरम्यान निदर्शनास आले. विशेष म्हणजे इतक्या गंभीर घटना घडत असताना संबंधित कंत्राटदार किंवा जबाबदार व्यवस्थापक घटनास्थळी उपस्थित नसल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिली आहे.

 या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी निवेदनात केली आहे.

संबंधित पोस्ट

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार– अभिनेते अमीर खान

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार..

बारामती पोटनिवडणूक- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा वाढला जोर

छत्रपती शिवरायांना मानवंदना देत ‘दुर्गोत्सव’ या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होण्याचे महाराष्ट्र शासनाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आज 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील.