vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा दौरा

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा दौरा

लातूर, प्रतिनिधी : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सहकार मंत्री श्री. पाटील यांचे सकाळी १०.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी’ निवासस्थान येथून अहमदपूर तालुक्यातील माकणीकडे प्रयाण करतील. सकाळी १०.४५ वाजता ते माकणी येथे कै. बालासाहेब वाघमोडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १२ वाजता धानोरा तीर्थ येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या गुलाल उधळण कार्यक्रमास ते उपस्थिती लावणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता शिरूर ताजबंद येथून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पाणी टंचाई आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता शिरूर अनंतपाळ येथील हॉटेल आशा येथे आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व मुक्काम.

संबंधित पोस्ट

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे• औसा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तरे शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;अहवालांतील विलंबही कमी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार…

महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद- 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’उपक्रमØ आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…