vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा..

जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा..

कोल्हापूर, प्रतिनिधी जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे आदी उपस्थित होते

या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, या विकास आराखड्यांतर्गत जी कामे सुरू आहेत, ती अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत; तसेच सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक लोकांना विश्वासात घेण्यात यावे. ज्योतिबा मंदिर परिसरात अतिक्रमण आहे का, तसेच त्या ठिकाणी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे का, याची माहितीही त्यांनी यावेळी जाणून घेतली.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गुरव यांनी येत्या 16 मे पासून जनगणनेचे काम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी अंबाबाई देवस्थान परिसरातील जागांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. तर प्रशासनाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनाबाबत दोन बैठका झाल्या असल्याची माहिती करवीरच्या प्रांताधिकारी श्रीमती बर्डे-चौगुले यांनी या बैठकीत दिली.

जिल्हाधिकारी राठोड यांनी यावेळी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. या बैठकीसाठी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. मस्कर तसेच आर्किटेक्ट रेवा पेठे यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” 2026 अतंर्गत आयोजीत रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जालना येथे 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ; युवकांना रोजगाराच्या संधी…

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा* *4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

शांताई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्य वाटप

आपत्कालीन स्थितीबाबत सर्वंकष आढावा-रक्तदात्यांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचेमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…