vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शांताई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्य वाटप

शांताई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्य वाटप

 

राज्य प्रतिनिधी ‘वडीगोद्रीअतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.अनेक कुटुंबे अडचणीत सापडली असून,त्यांच्या जगण्यावर संकट ओढवले आहे.या संकटाच्या काळात शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.

शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानच्यावतीने निराधार,वंचित आणि आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये किराणा साहित्य गव्हाचे पीठ,तांदू, हळद,मिरची पावडर,साखर,चहा पावडर,शेंगदाणे,डाळी,बिस्कीट,चिवडा यासह आवश्यक साहित्य यांचा समावेश होता.या मदतीमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आर. व्ही. छल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.संस्थेचे कार्यकर्ते व स्थानिक युवकांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष भेट देत मदत पोहोचवली.या प्रसंगी अध्यक्ष आर व्ही. छल्लारे म्हणाले की,“सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून संकटाच्या काळात समाजासोबत उभे राहणे हीच खरी सेवा आहे.प्रत्येक सक्षम नागरिकाने आपल्या परीने अशा आपत्तीच्या काळात हातभार लावून मदत केली आहे.

संबंधित पोस्ट

खानापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या पदभरतीसाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके

डॉ गोविंदराज यांनी केला क्षेत्रीय पाहणी दौरा, शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी साधला संवाद.

vishwatmaklokswamivarta

बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्दमुलांच्या शासकीय निवासी शाळेतील प्रवेश सुरु..

शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे लाभ घेण्याचे आवाहन