vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार–जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील*निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार*

*कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार–जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील*निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार*

मुंबई प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर” असे करण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलशयाचे नामांतर करण्याबाबत विनंती केली होती. शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून कोयना जलसागरास छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे ओळखले जाईल .

जलसागराचे नामांतर करण्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानंतर शासन निर्णय जारी झाल्याने येथून पुढे शासनाचा पत्रव्यवहार आणि अभिलेखा मध्ये तसा उल्लेख करण्यात येईल.

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार – संतोष साळवी कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठीतील वापरावर चर्चा

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ” – शिवराज सिंह चौहान