vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

 

बुलढाणा (प्रतिनीधी,)देशातील क्षयरोगातुन होणारा मृत्युचा दर हा 25% ने कमी झाला आहे. हे देशाच्या आरोग्य विभागाचे यश आहे. पंतपंधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील टि.बी.मुक्त भार देश निर्माण करण्यासाठी देशातुन क्षयारोगाचे उच्याटन करुया असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केले. तर क्षय मुक्त भारत करण्यासाठी लोकप्रतिनिधीचा सहभागी महत्वपूर्ण असल्याचे मत केंद्रीय आयुष,आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलं

देशातुन क्षयरोगाच समुच्य निर्मुलन करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विशेष टि.बी. मुक्त अभियान देशभर राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या संदर्भांत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 2015 नंतर टि.बी.च्या रुग्णसंख्येत 21% आणि मृत्युदरात 25% घट झाली आहे. ही भारताच्या आरोग्य विभागाची मोठी उपलब्धी आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागरी हवाई उड्डयन मंत्री मुरलीधर मोहळ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश क्षयरोग मुक्त (टि.बी.मुक्त) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अमलबजावणी महाराष्ट्रात सुध्दा व्हावी या दृष्टिकोनातन या बैठकीच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, टि.बी.मुक्त अभियानाला गती देण्यासाठी लोकप्रतिनीधींचा सहभाग महत्वपुर्ण आहे. प्रत्येक लोकप्रतिनीधीनीही त्यांच्या मतदार संघामध्ये आढावा घेऊन या अभियानाला गती देण्याचे काम केल्यास पंतपंधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील टि.बी.मुक्त भारत होण्यास वेळ लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टि.बी.मुक्त भारत देश हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी या अभियानांत सहभागी होऊया असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याप्रसंगी केले. या बैठकीला उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांनी या अभियाना संदर्भांत सकारात्मक चर्चा केली. हे अभियांन यशस्वी करण्याचा संकल्पही केला. या बैठकीला विविध राजकिय पक्षाचे खासदार उपस्थित होते

संबंधित पोस्ट

शिक्षणाच्या खासगीकरणावर भर : आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

vishwatmaklokswamivarta

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी· राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिल पर्यंत कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन..

मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध महापालिकेची विशेष मोहिम…

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पार पडणार

विशेष वृत्त..वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित१५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार