vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुढील पाच दिवसांसाठी वीजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी

पुढील पाच दिवसांसाठी वीजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी..

मुंबई, प्रतिनिधी: मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांतील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नंदुरबार, नाशिक घाट परिसर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

०२ ऑगस्ट २०२६ रोजी रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

०३ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

०४ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

०५ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

संबंधित पोस्ट

पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून विभागाचा आढावा-पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार,पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार- पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

स्वच्छताकार्यातून महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रशिक्षणवर्ग

तिरूपती मंदिरा मध्ये वैकुंठ द्वारका चे दर्शन घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या मध्ये टोकन देताना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती….

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याला आणि पावसाला जोरदार सुरुवात 🌧️ ♦️जिल्ह्यात रेड अलर्ट जारी