vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ” – शिवराज सिंह चौहान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ” – शिवराज सिंह चौहान

राज्य प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बिमा सखी योजने’चा ऐतिहासिक शुभारंभ आम्ही यशस्वीरित्या केला आहे, असे ‘बिमा सखी योजने’बद्दल बोलताना, केंद्रीय ग्रामीण विकास तसेच कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सांगितले. ही योजना केवळ महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेच नाही तर ग्रामीण आणि निमशहरी भारताला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले. देशातील प्रत्येक महिलेला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ग्रामीण विकास मंत्रालयाने भारत सरकारचे ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ हे ध्येय साकार करण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) सोबत एक महत्त्वाची भागीदारी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या वित्तीय समावेशन उपक्रमांतर्गत, देशभरातील बचत गटांमधील (SHG) प्रशिक्षित महिलांना ग्रामपंचायत स्तरावर ‘बिमा सखी’ म्हणून नियुक्त केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

‘बिमा सखी’ ही योजना ग्रामीण तसेच शहरी पातळीवर स्थानिक रोजगार निर्मिती आणि महिलांच्या कामगार सहभागाच्या दिशेने एक नवीन अध्याय लिहीत आहे, असे मंत्री म्हणाले. ही योजना सरकारच्या महत्त्वाच्या योजनांशी सुसंगत असून ती जन-धन से जन सुरक्षा, डिजिटल इंडिया आणि महिला कौशल्य विकास यासारख्या योजनांना बळकटी देते. याशिवाय, आपत्ती संरक्षणातही योगदान देणारी ही योजना आपत्तीग्रस्त भागातील ग्रामीण कुटुंबांसाठी आर्थिक कवच म्हणून काम करेल.

सर्व राज्ये आणि भागीदार संस्थांना या लोक चळवळीत सामील होण्याचे तसेच ‘विमा सखी योजना’ प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शाळेच्या दर्शनी भागात शैक्षणिक शुल्का बाबत माहिती देणारे फलक सर्व शाळांनी लावावेत- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी