vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांच्याकडे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक (व्यक्ती) यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली या कार्यालयात तसेच शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी पुरस्काराची सविस्तर जाहिरात दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजीच्या राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रामध्ये प्रसारीत करण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई,महोत्सवात नेत्रदीपक लेझर शो, टेंट सिंटी, पर्यटकांसाठी साहसी खेळ,विविध परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले पाच नवीन न्यायाधीश; राष्ट्रपतींकडून नियुक्त्यांना मंजुरी

vishwatmaklokswamivarta

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमधील तपासणी व उपचार हे नि:शुल्क..

vishwatmaklokswamivarta

दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

अ.भा. लोकहित महासंघाची स्थापना