vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

 

     नवी मुंबई, प्रतिनिधी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम दि. 28 व 01 मार्च रोजी खारघर नवी मुंबई येथील ओवे मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी देश आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने, त्यांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची अंतिम टप्प्यातील पाहणी आणि आढावा आज कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन घेतला.

  यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर आयुक्त फरोग मुकादम, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, रायगड उपजिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मैदानाची सज्जता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन,लंगर व्यवस्था, मुख्य मंडप आदी बाबींच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हिंद दी चादर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कामांसाठी संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समित्यांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला

    यावेळी पनवेल महानगपालिकेने या समागम कार्यक्रमासाठी देश व राज्य भरातून येणाऱ्या भाविकांना वाहनतळ आणि निवास व्यवस्थेविषयी सुलभतेने माहिती मिळावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या हिंद दी चादर मोबाईल ॲप बद्दल माहिती देण्यात आली. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर खरा इतिहास मांडणारे संशोधक म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार – खासदार शाहू छत्रपती

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार,पुढील काही तास धोक्याचे 5 दिवस राज्यासाठी IMDने तीव्र हवामान अलर्ट जारी केले…

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून  गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta